
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनस आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करतोय. अशा परिस्थितीत आता प्रियांकाने तिच्या पतीला किस करतानाचा फोटो शेअर करून रोमँटिक पद्धतीनं आफलं प्रेम व्यक्त केलं आहे.

प्रियांकाने निकला 'लव्ह ऑफ माय लाईफ' म्हणत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत निक पिवळ्या ड्रेसमध्ये प्रियांकाला किस करताना दिसतो आहे आणि प्रियांका तिच्या पतीला मिठी मारत आहे.

या सुंदर फोटोमध्ये त्याच्या भोवती फुगे आणि क्लासिक कार दिसत आहेत.

फोटो शेअर करताना तिनं लिहिलं आहे की माझ्या आयुष्यातील प्रेम. माझ्या बाजूच्या सर्वात उदार आणि सर्वात उत्कट व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्यावर प्रेम करते... तू जसा आहेस त्याबद्दल धन्यवाद.

प्रियांका नेहमीच तिचा पती निक जोनाससोबत खूप रोमँटिक फोटो शेअर करत असते, जे पाहून चाहतेही वेडे होतात.

तसे, प्रियांका काही काळ तिच्या शूटिंगसाठी यूकेमध्ये होती, परंतु प्रियांका निकच्या वाढदिवसासाठी अमेरिकेत पोहोचली आहे.