
आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. आजचा रंग पिवळा आहे त्यामुळे सगळेच या रंगाचे कपडे परिधान करून फोटो शेअर करत आहेत. अशावेळी ‘शालू’ कशी मागे राहील बरं! ‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने देखील पारंपारिक वेशात आणि मराठी साज करत फोटो शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.

शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खराचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चित्रपटात उत्कृष्ट काम केले. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. ‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता, मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

चित्रपटात राजेश्वरीच्या वाट्याला जास्त डायलॉग आले नसले तरी, तिने तिच्या नजरेनेच सगळ्यांची मने जिंकली होती. तिच्या चेहऱ्यावरील सहज अभिनय चाहत्यांना भावला होता. चित्रपटात जब्याप्रमाणे शालूच्या भूमिकेला तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही. ‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु, तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र इतक्या काळानंतर ती बदलेल्या अवतारात पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसमोर आली आहे.