
हिमांशू शर्मा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम कलाकार आहे. हिमांशूला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. आज हिमांशू त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. अशात, तुम्हाला आम्ही कनिका ढिल्लन यांच्यासोबत हिमांशूच्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत, एवढंच नाही तर त्यांनी स्वरा भास्करला डेट केलं आहे.

हिमांशूनं 'तनु वेड्स मनु' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांच्या स्क्रिप्ट लिहिल्या आहेत. हिमांशूला 2016 मध्ये 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' साठी राष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे, लेखकाचा पुढील प्रकल्प बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट 'अतरंगी रे' आहे.

हिमांशू एकेकाळी अभिनेत्री स्वरा भास्करला डेट करत असे. मात्र स्वरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्यानं कनिका ढिल्लनशी लग्न केलं. कनिकासुद्धा लेखिका आहे.

हिमांशू आणि कनिकाचं प्रेम प्रकरण 2019 मध्ये सुरू झालं. 2020 मध्ये, रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर काही दिवसांनी, दोघांनीही त्यांचं नातं अधिकृत केलं. जून 2020 मध्ये हिमांशूनं कनिकासोबतच्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केला होता.

यानंतर, डिसेंबर महिन्यात कनिकानं काही फोटो शेअर केली आणि सांगितलं की तिने हिमांशूशी लग्न केलं आहे. दोघांनी खुलेपणानं आपलं प्रेम चाहत्यांसमोर मांडलं होतं.

रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर काही दिवसांनी दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्यास उशीर केला नाही. हिमांशूनं 4 जानेवारी 2021 रोजी कनिकासोबत आपले लग्न शेअर केले.