
अभिनेता हृतिक रोशन आणि रेखा यांना आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमांमध्ये काम केल्यामुळे हृतिक रोशन आणि रेखा यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

हृतिक आजही स्वतःच्या अभिनयाने आणि हटके स्टाईलमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. पण रेखा बॉलिवूडपासून दुर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्तेत असतात.

दरम्यान, पुन्हा हृतिक रोशन - रेखा यांचा पुरस्कार सोहळ्यातील एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघे लिपलॉक करताना दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.

सध्या हृतिक रोशन 'फायटर' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'फायटर' सिनेमात देखील दोघांचे लिप-लॉक सीन आहेत.

रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा यांचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.