

हुमाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2012 साली दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटापासून केली. हुमाचे काम पाहून तिची तुलना प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी केली होती.

दरम्यान, हुमा कुरेशीला जेव्हा पहिला चित्रपट मिळाला होता, तेव्हा तिच्या कुटुंबीयांना हा एक सेक्स रॅकेटसाठीचा एक ट्रॅप आहे, असे वाटले होते. याबाबतचा अनुभव हुमा कुरेशीनेच सांगितलेला आहे. मला चित्रपटात काम मिळेल, याचा माझ्या आई-वडिलांना विश्वास नव्हता, असे हुमाने सांगितले आहे.

सोबतच माझ्या मला चित्रपटासाठी ऑफर मिळालेली नसुन हे एक वेश्यावृत्ती चालवणारे रॅकेट आहे, असे माझ्या कुटुंबीयांना वाटले होते. माझी ज्या चित्रपटासाठी निवड झाली होती, तो चित्रपट नंतर तयारच होऊ शकला नाही, असे हुमाने सांगितलेले आहे.

मी स्क्रिप्ट वाचली होती. माझी निवडही झाल होती. परंतु तो चित्रपट नंतर आलाच नाही, असेही हुमाने सांगितले. दरम्यान, हुमाचा सुरुवातीचा प्रवास फारच खडतर होता. आज मात्र ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलेले आहे.