
कलर्स टीव्हीचा डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने 3 मध्ये या आठवड्यात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी पाहुणे म्हणून दिसणार आहेत. या खास प्रसंगी स्पर्धक त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवर डान्स करणार आहेत.

90 च्या दशकात जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षितची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर आग लावायची. डान्स दिवानेमध्ये पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या होणार आहोत.

सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ एकत्र डान्स करणार आहेत.

माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ डान्स दिवानेच्या स्टेजवर कलंक चित्रपटातील एक सीन सादर करणार आहेत.

जॅकी श्रॉफ आणि माधुरीची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावणार आहे.

स्पर्धकांच्या नृत्य अभिनयाबरोबरच माधुरी दीक्षितची स्टाईल या डान्स रिअॅलिटी शोची यूएसपी आहे.