
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जान्हवीच्या प्रत्येक फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

आता देखील तिच्या नव्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

आता देखील जान्हवीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. अभिनेत्री कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

जान्हवी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री यश पहाडिया याला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. शिवाय अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त जान्हवीचे फोटो व्हायरल होत आहेत. सध्या जान्हवीचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची नजर हटतच नाही. जान्हवी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.