
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला म्हणाला तसा प्रतिसाद चाहत्यांच्या मिळाला नाही. हा चित्रपट फ्लाॅप गेला.

साऊथ चित्रपटामध्ये लवकरच जान्हवी कपूर ही डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे थेट ज्यूनियर एनटीआर याच्यासोबत काम करण्याची संधी ही जान्हवी कपूर हिला मिळालीये. एनटीआर 30 चित्रपटात जान्हवी महत्वाच्या भूमिकेत आहे.

नुकताच जान्हवी कपूर ही बहीण खुशी कपूर हिच्यासोबत थेट आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहचली. तिरुपती बालाजी मंदिरात तिने दर्शन घेतले. आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूर हिने गुलाबी आणि हलका हिरवा रंगाचा लेहेंगा घातला होता. तर खुशीने लाल आणि हिरव्या रंगाच्या लेहेंगा घातला. विशेष म्हणजे दोघींचाही जबरदस्त लूक दिसत आहे.

जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही देखील बाॅलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. खुशी कपूर आणि सुहाना खान एकाच चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे.