
अभिनेते ज्युनियर महमूद (junior mehmood) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोगामुळे ते अनेक वर्ष त्रासलेले होते. रिपोर्टनुसार, ज्युनियर महमूद यांचं निधन त्यांच्या राहत्या घरी झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ज्युनियर महमूद यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांना भेटण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील ज्युनियर महमूद यांच्या घरी आले होते.

एकेकाळी रॉयल आयुष्य जगणाऱ्या ज्युनियर महमूद यांनी शेवटच्या क्षणी ओळखणं देखील कठीण झालं होतं. एक काळ असा होता जेव्हा ज्युनियर महमूद सर्वात महागड्या गाडीमध्ये शुटिंगसाठी सेटवर पोहोचायचे.

ज्युनियर महमूद फक्त एका दिवसाच्या भूमिकेसाठी तेव्हा 3 हजार रुपये मानधन घ्यायचे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ज्युनियर महमूद यांच्या वडिलांची महिन्याची कमाई 320 रुपये होती.

1970 मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेते ज्युनियर महमूद यांच्या निधनानंतर सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्युनियर महमूद यांच्या निधनानाची चर्चा रंगली आहे.