
33 वर्षीय रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी दर्शनसह 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनसोबत कथितपणे रिलेशनशिपमध्ये असलेली अभिनेत्री पवित्रा गौडाला रेणुकास्वामीने अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे.

सध्या हायप्रोफाईल मर्डर केस प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दर्शन याच्याकडे गडगंज संपत्ती आहे. अभिनेता असण्यासोबतच दर्शन हा निर्माता आणि डिस्ट्रीब्यूटर देखील आहे.

सेलिब्रिटी नेटवर्थ वेबसाइटनुसार, तो दक्षिणेतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत येतो. त्याची एकूण संपत्ती 12 मिलियन डॉलर असल्याचे सांगितले जातं.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन एका सिनेमासाठी 80 ते 1.30 कोटी रुयपे मानधन घेतो. त्याच्या 'कंतारा' या सिनेमाने अभूतपूर्व यश मिळवलं आणि 400 कोटींहून अधिक कमाई केली.

दर्शनकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. लँड रोव्हर डिफेंडर, रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, ऑडी क्यू7, फोर्ड मुस्टँग, जॅग्वार एक्सके, टोयोटा वेलफायर, पोर्श केयेन, मिनी कूपर कंट्रीमन, टोयोटा फॉर्च्युनर, जीप रँग्लर आणि बीएमडब्ल्यू 5-सिरीज या गाड्या त्याच्या गॅरेजमध्ये आहेत.