
राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. राखी सावंत हिने तिचा पती आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आता राखी आणि आदिलचे प्रकरण थेट कोर्टात पोहचले आहे.

आदिल दुर्रानी याच्याबद्दल राखी सावंत हिने धक्कादायक खुलासे केले आहेत. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच सांगितले की, माझ्यासोबत लग्न करण्याच्या अगोदरच आदिल दुर्रानी याचे लग्न झाले होते.

राखी सावंत हिने फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप हे आदिलवर केले आहेत. आदिल दुर्रानी हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चाैकशी केले जात आहे.

या सर्व प्रकरणात टिव्ही क्षेत्रातील अनेक फेमस चेहरे हे राखी सावंत हिच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. यामध्ये कश्मीरा शाह हिच्या नावाचा देखील समावेश आहे. कश्मीरा शाह ही राखी सावंत हिच्यासाठी मैदानात उतरली आहे.
