
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर इतका बोलबाला होता की, आता दोघांनीही हळदीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांसोबतच सेलेब्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

विकी कौशल आणि कतरिना कैफचे गुरुवारी लग्न झाले. दोघांनी लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली.

आता विकी आणि कतरिनाने हळदीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना दोघांनी एकच कॅप्शन लिहिले आहे ते म्हणजे ‘ शुक्र, सब्र, ख़ुशी’.

कतरिना कैफने हळदीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यासोबत तिने गुलाबी रंगाचा दुपट्टा कॅरी केला होता. तिच्या हातावर मेहंदीही होती.

दोघांचे हे फोटो खूपच क्यूट आहेत. दोन्ही कलाकारांच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. हळदीमध्ये विकी कौशल पूर्ण धमाल-मस्तीच्या मूडमध्ये दिसला होता.