
सुपरकपल कतरिना कैफ आणि विकी कौशल हे लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनी 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये सात फेरे घेतले आहेत. विकी आणि कतरिना आता सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत आहेत. कतरिनाने आज ‘वधू’च्या वेशातील तिचे फोटो शेअर केले आहेत.

वधूच्या जोडीमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, ज्यामध्ये खास पंजाबी टच होता. कतरिनाचा वेडिंग ड्रेस डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केला आहे.

कतरिनाने आपल्या बहिणींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या बहिणी तिच्यावर या फुलांची चादर धरून येताना दिसत आहे. यावेळी कतरिनाच्या चेहऱ्यावर छानसं हसू आहे.

हे फोटो शेअर करताना कतरिनाने लिहिले की, ‘मोठे झालो आहोत, आम्ही बहिणी नेहमीच एकमेकांचे संरक्षण करत आहोत. हे माझे आधार स्तंभ आहेत आणि आम्ही एकमेकांना आधार देतो. हे नेहमीच असेच राहिले आहे. कतरिनाच्या या पोस्टला काही मिनिटांतच 10 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

कतरिनाच्या फोटोंवर तिचा मेव्हणा सनी कौशलने कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. त्याचवेळी चाहत्यांच्या नजरा कतरिनावरून हटत नव्हत्या.