
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा शाही विवाहसोहळा हा 7 फेब्रुवारी रोजी पार पडलाय. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांनी सात फेरे घेतले.

जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. 80 रूम या पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी बुक करण्यात आल्या होत्या.

हा शाही विवाहसोहळा अत्यंत खासगी पध्दतीने पार पडला. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी विवाहसोहळ्यातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या मेहंदी समारंभातील काही फोटो पुढे आले आहेत. या फोटोंमध्ये कियारा आणि सिद्धार्थचा लूक जबरदस्त दिसतोय.
