
कलर्स टीव्हीचा 'झलक दिखला जा 10' हा शो सध्या चर्चेत आहे. झलक दिखला जा 10 मध्ये 'कपूर स्पेशल' एपिसोड साजरा करण्यात आला.

झलक दिखला जाच्या या खास एपिसोडमध्ये सोशल मीडिया स्टार किली पॉलने देखील उपस्थिती लावली होती. यावेळी किसीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

बॉलिवूड स्टार माधुरी दीक्षितसोबत किली पॉलने जबरदस्त असा डान्स केला. माधुरी आणि किलीचा हा डान्स सर्वांनाच प्रचंड आवडलाय.

माधुरी आणि किलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. माधुरीच्या स्टाईलमध्ये किसीने डान्स केला.

अदा मलिक, निशांत भट आणि सृती झा यांनी आता झलक दिखला जामध्ये एंट्री घेतलीये. निशांतने अप्रतिम डान्स या एपिसोडमध्ये केलाय.