
वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर प्रत्येक जण निराश आहेत. सोशल मीडियावर सेलिब्रिटी देखील भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान क्रिकेटपटू के.एल राहुल याची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिची देखील पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.

अथिया शेट्टी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने 'ही टीम... सर्वांत बेस्ट टीम आहे....' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या सर्वत्र अथिया हिची पोस्ट चर्चेत आहे.

वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघ आणि पती के.एल राहुल याली चियर करण्यासाठी अथिया आली होती. अथिया हिच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील आली होती.

अथिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती अभिनेते सुनिल शेट्टी यांची लेक आहे. अभिनेत्रीने 'हिरो' सिनेमाच्याम माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अथिया हिला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करता आलं नाही.

अथिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अथिया स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.