
लॅक्मे फॅशन वीक 2021 सुरू झालं आहे आणि श्रद्धा कपूरने शनिवारी यात रॅम्प वॉक केला. श्रद्धाचा लूक सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.

श्रद्धाने डिझायनर अनामिका खन्ना यांच्या लेबल एक-ओकेसाठी रॅम्प वॉक केला. ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये श्रद्धा खूप सुंदर दिसत होती.

श्रद्धाच्या काळ्या ड्रेसमध्ये कटआउट्स आणि क्रिसक्रॉस डिझाइन होती जे ड्रेसच्या सौंदर्यात भर घालत होती. या ड्रेससह तिनं अतिशय साधा मेकअप केला आणि मोकळे केस सोडले.

श्रद्धाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या लूकचं खूप कौतुक करत आहेत.

लॅक्मे फॅशन वीक 10 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. कोरोनानंतर सादर होत असलेला हा पहिलाच फॅशन विक आहे. हा कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.