
अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) कदाचित चित्रपटांपासून दूर असेल, पण ती सध्या चर्चेचा भाग बनली आहे. अलीकडेच तिला टेनिस स्टार लिएंडर पेससह (Leander Paes) गोव्यात स्पॉट केले गेले होते. किम आणि लिएंडरचे गोव्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांना पाहून त्यांच्या डेटिंगबाबत कयास लावले जात आहेत.

गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये लिएंडर आणि किम जेवणाचा आनंद घेत असलेले फोटो समोर आले आहेत. पहिल्या फोटोत दोघेही कॅमेर्याच्या दिशेने हसत असताना पोज देत आहेत.

दुसर्या फोटोमध्ये किम लिएंडर पेसला मिठी मारताना दिसत आहे. किमने शॉर्ट्स आणि पांढरा लांब-सैल शर्ट घातला होता, तर लिएंडरही कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसला होता.

किम आणि लिएंडरचे हे फोटो त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना हवा देत आहेत. मुंबईतही दोघांना एकाच वेळी पण वेग वेगळे स्पॉट केले गेले होते. किम आणि लिएंडर दोघेही फिरायला बाहेर गेले होते. तथापि, त्यांच्या फोटोंशिवाय त्यावेळी डेटिंगविषयी फारशी चर्चा झाली नव्हती.

पण आता गोव्यातील या सुट्टीमध्ये किम आणि लिएंडरचे फोटो त्यांचे नाते सांगत आहेत. याक्षणी दोघे अविवाहित आहेत, त्यामुळे त्यांच्या अफेअरविषयी अनेकदा अटकळ बांधली जात आहे.

लिएंडर पेसचे 2017मध्ये रिया पिल्लईशी लग्न झाले होते. पण काहीच काळात दोघेही वेगळे झाले. त्याचवेळी अभिनेता हर्षवर्धन राणे याच्यासमवेत किमच्या अफेअरची चर्चा झाली. किम शर्मा हिला ‘मोहब्बतें’ या चित्रपटाद्वारे ओळख मिळाली. यानंतर त्यांनी ‘तुम से अच्छा कौन है’, ‘जिंदगी रॉक्स’, ‘मनी है तो हनी है’ अशा चित्रपटांमध्ये काम केले, परंतु तिला हवे तितके यश मिळू शकले नाही.