
सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. याच कार्यक्रमामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून शिवाली परबला ओळखले जाते.

‘कल्याणची चुलबुली’ म्हणून तिला ओळखले जाते. या कार्यक्रमातून शिवाली परब प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असते.

आता शिवालीने तिचे अमेरिकेतील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोत ती न्यूयॉर्कमधील सिटी ब्रीजवर छान एन्जॉय करताना दिसत आहे.

यावेळी शिवालीने गुलाबी रंगाचा वनपीस परिधान केला आहे.

त्यासोबतच तिने ब्राऊन रंगाचे शूज, जिन्सचे हुडी आणि बॅग असा लूक केला आहे.

"मला तुझ्या दुनियेत घेऊन जा", असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. यात शिवाली परबचा स्टायलिश आणि हटके अंदाज पाहायला आहे.

शिवालीच्या या फोटोंवर अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे.