
बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून अर्जुन कपूर याला डेट करत आहे.

मध्यंतरी एक चर्चा होती की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. नुकताच मलायका अरोरा हिने एक मुलाखत दिलीये.

या मुलाखतीमध्ये मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठा खुलासा करताना दिसली. मलायका अरोरा म्हणाली की, मी कायमच अर्जुन कपूर याला जेवण तयार करून देते.

मुळात म्हणजे अर्जुन कपूर याला जेवण तयार करता येत नाही. जेवणच काय तर त्याला साधा चहा देखील तयार करता येत नाही, असा खुलासा मलायका अरोरा हिने केला आहे.

मलायका अरोरा ही पुढे म्हणाली की, अर्जुन कपूर याला माझ्या हाताचे जेवण प्रचंड आवडते. यामुळे मी कायमच त्याला सर्वकाही तयार करून देते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे.