
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे नुकतेच निधन झाले. राज कौशल हे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता होते. त्यांची बॉलिवूडमध्येही मजबूत पकड होती. त्यांनी अनेक बड्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले ज्यात "प्यार में कभी कभी" आणि "शादी का लड्डू" सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश होता.

त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी मंदिरा बेदीने आपला जुना बंगला भाड्याने दिल्याचे वृत्त समोर आले आहे. राज आणि मंदिरा बराच वेळ त्यांच्या या सुंदर बंगल्यावर घालवत असत.

अभिनेत्रीचा हा बंगला मुंबईजवळील मड बेटावर आहे. हा एक सुंदर सी फेसिंग व्हिला आहे. आता या व्हिलाची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीचा हा बंगला सी व्ह्यू हाऊस आहे. यात एक पूल देखील आहे. या घरात 4 बेडरूम आणि 5 बाथरूम आहेत.

या घरात एक रात्र राहण्यासाठी तुम्हाला 42,000 रुपये खर्च करावे लागतील. असे म्हणतात की हे घर मंदिरा आणि तिच्या आईने एकत्र खरेदी केले होते. अनेकदा हा व्हिला शूटिंगसाठीही वापरला जातो. अर्थात भाडे तत्वावर दिला जातो.

4 मार्च रोजी या बंगल्याचे फोटो एअरबीएनबीने आपल्या वेबसाइटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये मंदिरा बेदी फोटो पोज देताना दिसत आहे.