
बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे नुकतंच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. पतीच्या मृत्यूमुळे ती पूर्णपणे तुटली आहे. अशा परिस्थितीत तिनं सध्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

पतीच्या मृत्यूनंतर मंदिरा एकटी पडली आहे, त्यामुळे आता तिला तिच्या पतीचा खूप अभाव जाणवतोय. या कारणामुळेच ती पतीच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे.

अशा परिस्थितीत काही खास क्षणांचे फोटो तिनं शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिनं लिहिलं, की ‘25 वर्षे एकमेकांना ओळखून, लग्नाला 23 वर्षे झाली... सर्व संघर्षातून..’

या पोस्टमधून स्पष्टपणे दिसतंय की मंदिरा दररोज राजला किती मिस करतेय.

राज गेल्यानंतर आता मंदिराला दोन्ही मुलांचा सांभाळ एकट्याने करावा लागणार आहे. राज आणि मंदिराचे 1999 साली लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांनी एका मुलीला गेल्या वर्षीच दत्तक घेतले होते. घरी मुलगी आल्यामुळे राज खूप खुश झाला होता. इतकेच नाही तर, ते सोशल मीडियावर मुलांबरोबर फोटोही शेअर करत असत.

नुकताच राज यांनी मुलांसमवेत फादर्स डे साजरा केला होता. मंदिरा बेदीचे पती राज कौशल एक भारतीय दिग्दर्शक, निर्माता होते. ‘प्यार मे कभी कभी’, ‘शादी का लड्डू’, ‘अँथनी कौन है’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.