
अभिनेत्री प्राजक्ता माळी... प्राजक्ता ही सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री... तिच्या मालिका, सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळते.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होते. आताही तिने एक खास पोस्ट शेअर केलीय.

काही दिवसांआधी प्राजक्ताने कर्जतमध्ये एक फार्म हाऊस खरेदी केलं आहे. या फार्म हाऊसचा व्हीडिओ प्राजक्ताने शेअर केला आहे.

या प्रेमाच्या दिवशी माझ्या आयुष्यातील प्रेम तुमच्यासोबत शेअर करतेय, My true love... असं म्हणत प्राजक्ताने हा व्हीडिओ शेअर केलाय.

बाकी यंदाचेही वर्षी, अखिल भारतीय सिंगल संघटनेस, संत व्हेलेंटाईन- दिनाच्या माझ्याकडून मनापासून शुभेच्छा... असंही प्राजक्ताने या पोस्टमध्ये म्हटलंय.