
आज बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा वाढदिवस आहे, तिच्या जिमच्या मैत्रिणी साराला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी पोहोचल्या. साराची जिम ट्रेनर नम्रता पुरोहित आणि जान्हवी कपूर यांना साराच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं.

जान्हवी कपूर आणि नम्रता यांनी सारा अली खानला वाढदिवसानिमित्त सरप्राईज दिलं.

आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खानचा वाढदिवस आहे, सारा बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. तिनं अनेक मोठ्या स्टार्ससोबत मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यासह, लवकरच ती अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

तिची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे. तिला सतत चित्रपटांमध्ये काम मिळतंय.

जान्हवी कपूर आणि सारा अली खान टॉप अभिनेत्री असल्या तरी या दोघींमध्ये चांगली मैत्री आहे.