
अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिद कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसतो. पत्नीसोबत देखील शाहिद कपूर यांचं प्रेमळ नातं आहे.

शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर मीरा कायम सक्रिय असते. मीरा कायम तिच्या वैवाहिक आयुष्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

आता देखील मीरा राजपूत हिने पारंपरिक लूकमध्ये खास फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र मीरा राजपूत हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटोमध्ये मीरा प्रचंड सुंदर दिसत आहे.

मीरा राजपूत हिच्या फोटोवर फक्त शाहिद कपूरच नाही तर, चाहते देखील फिदा झाले आहे. मीरा हिच्या फोटोंवर चाहले लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

मीरा आणि शाहिद कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सिनेमा विश्वासोबत थेट संबंध नसतानाही शाहिदच्या आयुष्यात आलेल्या मीरानं त्याच्या विश्वात एक कायमस्वरूपी आणि भक्कम असं स्थान तयार केलं.