
या हिवाळ्यात समुद्र किनारी बॉडी फ्लाँट करण्याची संधी मौनीने सोडलेली नाही. मौनी रॉयने (Mouni Roy) निळ्या बिकिनीमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटोंनी इंटरनेटवर सर्वांनाच थक्क केले आणि तिचे फोटो पाहून आता चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत.

तिच्या सोशल मीडिया हँडलवर मौनीने निळ्या रंगाच्या बिकिनीतील स्वतःचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि हे फोटो इंटरनेटवर आग लावत आहेत.

निळ्या रंगाच्या हाल्टर-नेक बिकिनीमध्ये मौनी खूप सुंदर दिसत आहे. मौनी केस मोकळे सोडून समुद्र किनाऱ्याच्या मध्यभागी एका खांबावर टांगलेल्या क्रोकेट हॅमॉकवर बसली आहे.

गुलाबी लिपस्टिक परिधान करून, मौनीने गुलाबी ब्लश आणि हायलाइट केलेले गाल, काळ्या आयलाइनरसह छान मेकअप केला आहे.

कॅमेर्यासाठी अप्रतिम पोझ देत, मौनी रॉयने तिच्या नवीन व्हायरल फोटोंसह चाहत्यांना आणि फॅशन प्रेमींना थक्क केले.