
अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच चर्चेचा भाग असते. ती तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात.

मौनी रॉय रोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. आता परत तिने तिचे फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मौनीने स्कार्फपासून बनवलेला टॉप परिधान केला आहे. यासोबत तिने काळ्या रंगाची पॅन्ट आणि लांब बूट घातले आहेत. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

मौनीच्या फोटोंना 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. टीव्ही सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तन्वी शाहने फायर इमोजी पोस्ट केले तर आमना शरीफने देखील हार्ट इमोजी पोस्ट केले.

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर, मौनी रॉय लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.