
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे अनेक ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. आता अभिनेत्रीने दुबईतील तिचे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बोल्ड आउटफिटमध्ये दिसत आहे.

मौनीने ऑरेंज कलरचा ट्यूब टॉप आणि स्किन कलरचा स्कर्ट परिधान केला आहे. दुबईत मौनीची ही ग्लॅमरस स्टाईल पाहून चाहतेही तिचे कौतुक करत आहेत.

काही दिवसांपासून मौनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत आहे. मौनी दुबईतील बिझनेसमन सूरज नांबियारला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.

बातमीनुसार, मौनी पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला लग्न करणार आहे. तिला आता वैयक्तिक आयुष्यात स्थिरावायचे आहे.

एका मुलाखतीदरम्यान मौनीच्या चुलत भावाने सांगितले होते की मौनी आणि सूरज दुबई किंवा इटलीमध्ये लग्न करू शकतात. या लग्नात फक्त कुटुंबीयच असतील. भारतात परतल्यानंतर दोघंही इथल्या मित्रांसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहेत.