

अमित आणि त्याची पत्नी श्रद्धा दोघेही डोंबिवलीला राहत होते. एक दिवशी लोकल ट्रेनमध्ये एकमेकांना पाहिलं. त्यानंतर अमित त्याच्या कामासाठी निघून गेला. श्रद्धाला इतकंच माहिती होतं की हा अभिनेता आहे...

घरी गेल्यानंतर श्रद्धाने तिच्या भावाला याचं नाव विचारलं पण त्यानेही मालिकेतलंच नाव सांगितलं. मग गुगल केलं, बरीच शोधाशोध केली तेव्हा अमितचं खरं नाव कळालं. मग तिने फेसबुकवर त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

त्याच रात्री दोघांचं बरंच बोलणं झालं. मग डोंबिवली स्टेशनला पहिल्यांदा भेटायचं ठरवलं. तेव्हा स्टेशनवरच दोघांची भेट झाली. मग पुढे वरचेवर भेटी होत गेल्या अन् दोघे प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.

पहिल्यांदाच डेटवर गेलो तेव्हा जेवून वगैरे झालं. बील आलं... आम्ही दोघेही एकमेकांकडे बघतोय. तितक्यात बीलसाठी वेटर एकदा विचारून गेला. मात्र वॉलेट अडकलंय म्हणत अमितने बील दिलं नाही. मग शेवटी ते बील मीच दिलं. पण त्यानंतर आतापर्यंतची सगळी बिलं तोच देतो आहे!, असं श्रद्धाने एका मुलाखतीत सांगितलं.