
‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळा आज पार पडला. रमशा फारुकी ही या शोच्या पहिल्या सिझमची महाविजेती ठरली.

रमशाला 20 लाखाचा धनादेश आणि 'जाऊ बाई गावात'ची मानाची ट्रॉफी देण्यात आली. ‘जाऊ बाई गावात’ च्या महा अंतिम सोहळ्याला आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर याची उपस्थिती होती.

रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप पाच स्पर्धकांमध्ये चुरचीशी लढत पाहायला मिळाली. सगळ्यांना मागे टाकत रमशाने अखेर या शोची ट्रॉफी जिंकली.

3 महिन्यांची ही रोलरकोस्टर राईड जिंकल्यानंतर रमशाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. Oh My God! तो क्षण जेव्हा सरांनी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि 'जाऊ बाई गावातच्या' पहिल्या पर्वातली विजेती आहे 'रमशा'... तेव्हा मला वाटत होतं की मी स्वप्न पाहत आहे, असं रमशा म्हणाली.

गेली दोन महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले. तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानलं आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे, असं रमशा म्हणाली.