नागराज मंजुळे ‘या’ खास व्यक्तीकडून घेतात प्रत्येक चित्रपटाबद्दलचा पहिला सल्ला

| Updated on: Mar 28, 2024 | 5:20 PM

Nagraj Manjule on His wife Gargi Kulkarni : नागराज मंजुळे एका मुलाखती दरम्यान त्यांच्या सिनेमांबाबत व्यक्त झाले. त्यांनी त्यांच्या सिनेमांच्या स्क्रिप्टबद्दल सांगितलं. एखाद्या सिनेमाचा विचार मनात आला तर तो सगळ्यात आधी कुणाला सांगतात? त्यांची स्क्रिप्ट कोण आधी वाचतं? पाहा...

1 / 5
नागराज मंजुळे... मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक... सैराट सारखा सिनेमा नागराज यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिला. या सिनेमाने महाराष्ट्राला वेड लावलं. या सिनेमाची कथा, त्याचा आशय, गाणी सगळंच प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं.

2 / 5
नागराज यांच्या कविता त्यांचे सिनेमे समाज मनावर सकारात्मक ठसा उमटवतात. पण एखादी गोष्ट लिहिल्यानंतर ती कशी आहे? त्यात काय बदल केला पाहिजे. त्यावर सिनेमा होऊ शकतो का? या सगळ्याबाबत नागराज त्यांच्या जवळच्या काही माणसांशी चर्चा करतात.

3 / 5
नागराज त्यांच्या सहचारिणी गार्गी कुलकर्णी यांना त्यांची स्क्रिप्ट वाचायला देतात. अहमदनगरमध्ये शिकत असताना गार्गी आणि मी भेटलो. गार्गीला वाचनाची आवड आहे. ती खूप चांगल्या कविता लिहिते. फॅन्डीची पटकथा गार्गीनेच आधी वाचली होती, असं नागराज यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

4 / 5
गार्गी मोजकं लिहिते. पण खूप दर्जेदार लिहिते. तिला साहित्याची उत्तम जाण आहे. आता आम्हीसोबत आहोत. गार्गीशिवाय कुतुब प्रियांका या माझ्या मित्रांनाही मी माझी स्क्रिप्ट वाचायला देतो. हे लोक माझं लेखन वाचून प्रतिक्रिया देतात. त्यांचं म्हणणं ऐकून मग मी पुढचा निर्णय घेतो, असं नागराज यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

5 / 5
मी जे काही क्रिएटिव्ह करतो. त्यात गार्गीचा मोठा वाटा असतो. गार्गी म्हणजे माझा आरसा आहे, असं नागराज यांनी सांगितलं. फॅन्ड्री, सैराट, झुंड या सारखे सिनेमे नागराज यांनी केले आहेत. शिवाय नाळ आणि नुकताच आलेला नाळ 2 हे नागराज यांचे सिनेमेही प्रेक्षकांना आवडले.