Keralam CM Announcement | 10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री पदाच्या गादीचा हकदार?
केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेसचे महासचिव दीपा दासमुंशी यांनी गुरुवारी सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. व्ही. डी. सतीशन हे केरळमधील पुरावूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते.

आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर चार राज्यांत मुख्यमंत्री पदाची शपथविधी प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, केरळमध्ये मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये जोरदार चर्चांना उधाण आले होते. या शर्यतीत के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला आणि व्ही. डी. सतीशन यांची नावे चर्चेत होती. अखेर जवळपास दहा दिवसांच्या बैठका आणि चर्चेनंतर काँग्रेसने सतीशन यांच्यावर विश्वास दाखवला.
4 मे रोजी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस आघाडीने केरळमध्ये मोठे यश मिळवत LDF च्या दहा वर्षांच्या सत्तेला धक्का दिला. काँग्रेसला 63 जागा मिळाल्या, तर CPI(M) ला 26 जागांवर समाधान मानावे लागले. युडीएफ आघाडीच्या विजयामुळे आता केरळमध्ये काँग्रेसच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Published on: May 14, 2026 02:12 PM
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप