
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सोयराबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? ही आहे अभिनेत्री स्नेहलता वसईकर...

स्नेहलता वसईकरने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या ऐतिहासिक मालिकेत राणी सोयराबाईंची भूमिका केली. होती. स्नेहलताला या लूकमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना सवय आहे. मात्र स्नेहलताने आता तिच्या लूकमध्ये प्रचंड बदल केला आहे.

सन मराठी या वाहिनीवरील 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत स्नेहलता सध्या काम करते आहे. या मालिकेतील पात्रासाठी स्नेहलताने हेअर कट केला आहे. शॉर्ट हेअरमधील स्नेहलताचा हा लूक चाहत्यांना आवडतो आहे.

स्नेहलताचं हे ग्लॅमरस रूप अनेकांना आवडतं आहे. तू खरंच खूप सुंदर आहेस..., अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर या हेअरकटमुळे तुझं वय 10 वर्षांनी कमी दिसतं आहे, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे.

स्नेहलताने काही दिवसांआधी एक फोटोशूट केलं. या फोटोशूटमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. या बोल्ड फोटोशूटवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींना तिचा हा लूक आवडला होता. तर काहींनी यावर नाराजी दर्शवली होती.