
मुंबई | 20 मार्च 2024 : कामिया जानी... भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर... वेगवेगळ्या भागात कामिया ट्रॅव्हल करते. तिथले व्लॉग कामिया यूट्यूबला शेअर करते. तिच्या व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज असतात.

सरकारकडून देण्यात आलेला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड देखील कामियाला मिळाला आहे. ट्रॅव्हल व्लॉगर कामिया सेलिब्रिटींचे इंटरव्हूव देखील करते. या मुलाखतींनादेखील नेटकरी पसंती देतात.

प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा मिळवणारी कामिया सर्वसामान्य कुटुंबातील आहे. कामियाचं बालपण मुंबईतील घाटकोपरला आणि नंतर चेंबुरला गेलं. तिचे वडील आधी मेकॅनिक होते. मग ते रिक्षा ड्रायव्हर झाले. मग त्यांनी शोरूम उघडलं. टू व्हीलरची फोर व्हीलर्सची ते विक्री करायचे.

वडिलांच्या संघर्षाच्या काळातून बरंच काही शिकल्याचं कामिया सांगते. कामिया आधी पत्रकार होती. पण तिने प्रेगनेन्सीच्या काळात तिने ब्रेक घेतला. त्या ब्रेकमध्ये तिला बऱ्याच गोष्टी नव्याने जाणवू लागल्या.

एके दिवशी ठरवलं की आपण आपलं यूट्यूब चॅनेल सुरू करूयात. त्यासाठी मेहनत घेतली. आधी व्हीडिओ चालायचे नाहीत. पण मग लोक तिचे व्हीडिओ बघायला लागले. तिचे व्हीडिओ सध्या ट्रेंडिंग असतात.