
आज पाडव्याचा सण आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.नागपुरातही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. लक्ष्मीनगर चौकातून भव्य शोभायात्रा निघाली. ढोलताशा पथकाच्या गजरात नविन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. संदीप जोशी यांनी या शोभा यात्रेचं आयोजन केलं आहे.

गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत अभिनेत्री प्राजक्ता माळीने हजेरी लावली. पारंपरिक वेशात प्राजक्ता माळी या शोभायात्रेत सहभागी झाली होती. या शोभायात्रेत चित्ररथांचं प्रदर्शनही करण्यात आलं.

नागपुरात गुढीपाडवा शोभायात्रा पारंपरिक वेशात महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोक सहभाग झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकासाची गुढी उभारली गेली.

टीव्ही 9 च्या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्यांना गुढी पाडव्याच्या आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा... पाडवा म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक... त्यामुळे पाडव्याला सगळेच सोनं खरेदी करतात. तीच माझीही आठवण -आहे. लहानपणापासून आई-वडिलांनी काही ना काही घेऊन दिलेलं आहे.

तू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शोभायात्रेत सहभागी झाली आहेस. तुझी संघाशी काही जवळीकता आहे का? असा प्रश्न यावेळी प्राजक्ताला विचारण्यात आला. तेव्हा नियम, शिस्त सनातन धर्म जिथे जिथे पाळल्या जातात. तिथे-तिथे मी असणारच आहे, असं प्राजक्ता माळी म्हणाली.