
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले आहेत. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहेत. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती.

मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. सध्या एनसीबीने अनन्या पांडेला आज (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.

रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे सोबत, ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. अनन्या पांडेच्या घरून बाहेर आल्यानंतर एनसीबीची एक टीम शाहरुख खानच्या मन्नतच्या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

सर्च ऑपरेशनसाठी शाहरुख खानच्या घरी पोहोचलेल्या एनसीबी टीमचे अनेक फोटो समोर आले आहेत. एनसीबी टीम आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाच्या फायलींसह शाहरुख खानच्या घरी पोहोचली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील क्रूझमधून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आर्यन खान 3 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे. काल म्हणजेच बुधवारी आर्यन खानची जामीन याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली. यानंतर, आज म्हणजेच गुरुवारी, आर्यन खानच्या वकिलांनी शाहरुखच्या मुलाच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता 26 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.