
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि बॉलिव़ूड निर्माता निखील नमीत गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. सलमान खानची फिल्म बॉडीगार्डमूळे प्रार्थना आणि निखीलची फ्रेंडशिप झाली.

आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे ‘आपली यारी’ हे गाणं नुकतंच सोशल मीडियाव्दारे रिलीज केलं आहे.

फ्रेंडशीपडेच्या मुहूर्तावर आलेल्या ह्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झळकले आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “नादखुळा ह्या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमीत्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, ह्याचा मला आनंद आहे.’

ती पुढे म्हणाली, ‘निखीलची आणि माझी मैत्री खूप जूनी आहे. त्यामूळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा योग आहे.’