
'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या पोपटलालचं लग्न मालिकेत एक वेगळंच वळण घेऊन येतं. मात्र आता त्यांच्या लग्नासाठी योग्य वेळ आली आहे असं दिसतंय. यावेळी पोपटलाल कोणत्याही मुलीसाठी वेडे झाले नाही, तर मुलगी स्वतःच त्यांच्या प्रेमात पडली आहे. इतकंच नाही तर स्वत: मुलीनं पोपटलाल यांना प्रपोज केलं आहे. आता याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये पोपटलालसोबत एक सुंदर मुलगी दिसत आहे. पोपटलाल यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये मुलगी पोपटलालला गुडघ्यावर बसवून प्रपोज करत आहे. पोपटलालसुद्धा हा प्रस्ताव आनंदाने स्वीकारताना दिसत आहेत. पोपटलाल आणि दिसणारी मुलगी एका गार्डनमध्ये उभे आहेत.

ही मुलगी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चा एक भाग असून शोमध्ये ती संजनाची भूमिका साकारत आहे.

सध्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमध्ये लसीचा काळाबाजार करण्याचं प्रकरण दर्शविलं जात आहे. पोपटलाल आणि गोकुलधाम सोसायटीचे लोक हा काळा बाजाराचा व्यवसाय उघडकीस आणण्यात व्यस्त आहेत.