
फुलकुमारी पात्र साकारणारी नितांशी गोयल... नितांशी गोयल ही सिनेमात अत्यंत साधी आणि शांत वाटते. पण खऱ्या आयुष्यात ती प्रचंड ग्लॅमरस आहे.

फुलकुमारी भूमिकेत झळकल्यानंतर नितांशी हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीने फोटो व्हायरल होत असतात.

नितांशी फक्त वेस्टर्न ड्रेसमध्येच नाहीतर, साडीत देखील प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. सध्या नितांशी हिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

नितांशी हिने याआधी देखील अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'मैदान' सिनेमात देखील नितांशी हिने दमदार भूमिका साकारली होती.

नितांशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.