
पाकिस्तानी अभिनेता अली जफरला अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये चाहत्यांनी पाहिलं आहे. अली जफर एक चांगला अभिनेता आणि गायक आहे. मात्र अलीसारखा दिसणारा त्याचा भाऊ दान्याल जफरही कोणत्याही बाबतीत त्याच्यापेक्षा कमी नाही.

अलीप्रमाणेच, दान्याल देखील गायक आणि अभिनेता आहे. दोन्ही भावांच्या एकत्र फोटोमध्ये त्यांना ओळखणे खूप कठीण आहे.

दान्याल आणि अलीचा चेहरा अगदी एकमेकांसारखा आहे.

दान्यालही भावाप्रमाणे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार होता. मात्र जेव्हा पाक स्टार्सना भारतात बंदी घालण्यात आली तेव्हा त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

दान्याल अली हा जफरचा भाऊ आहे, मात्र संगीतकार म्हणून त्याची स्वतःची यशस्वी ओळख आहे. दान्यालनं सांगितलं होतं की, आऊ अलीनं त्याच्यासोबत एकापाठोपाठ एक फोटो शेअर केला होता, जो यशराज प्रॉडक्शनचं कास्टिंग डायरेक्टर सानूच्या लक्षात आला आणि त्याला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली. दान्याल आता पाकिस्तानचा एक चमकणारा तारा आहे आणि त्याचे मजबूत फॅन फॉलोइंग आहे.