
पंचायत ही वेबसिरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालते आहे. आधी या वेबसिरिजचे दोन भाग प्रचंड गाजले. त्यानंतर आता पंचायतचा तिसरा भाग रिलीज झाला आहे.

पंचायत या वेबसिरिजमधल्या पात्रांची प्रेक्षकांच्या मनावर छाप आहे. या वेबसिरिजमधलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलंस वाटतं. असंच एक पात्र म्हणजे पंचायतमधील सचिव...

पंचायत या वेबसिरिजमध्ये सचिव हे पात्र अभिनेता जितेंद्र कुमार याने साकारलं आहे. जितेंद्रच्या कामाचं प्रचंड कौतुक होतंय. या तिसऱ्या सिझनमध्येही 'सचिवजी'चांगलेच भाव खाऊन गेलेत.

सचिव हे पात्र साकारणारा अभिनेता जितेंद्र कुमार याने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. 'खामोशी' म्हणत जितेंद्रने शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

व्हाईट कलरच्या शर्टमधील फोटो जितेंद्रने शेअर केलेत. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. सचिवजी बडे हँडसम है!, अशी कमेंट चाहतीने केली आहे. द किंग ऑफ पंचायत अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.