
'पंचायत' ही वेबसिरिज प्रचंड गाजली. गावच्या मातीत घडणारी हो गोष्ट रसिकांना आवडली. या वेबसिरीजमधील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. याच वेबसिरीजमधील एक पात्र म्हणजे रिंकी...

'पंचायत' या वेबसिरिजमधील रिंकी हे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहातं. अभिनेत्री सानविका हिने रिंकी हे पात्र साकारलं आहे. सध्या अभिनेत्री सानविका ही चर्चेत आहे.

अभिनेत्री सानविका ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या पोस्ट ती शेअर करत असते. आताही तिने एक खास पोस्ट शेअर केलीय. सानविकाने हा खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

सानविकाच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. अनेकांनी कमेंट करत तिच्या या लूकला दाद दिली आहे. सचिवजींच्या नापास होण्याचं कारण तू आहेस रिंकी..., अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

तर ही एमबीएची तयारी सुरु आहे तर...!, अशीही कमेंट सानविकाच्या चाहत्याने केलीय. सौंदर्य कायम साधेपणात दडलेलं असतं, जशी तू पंचायतमध्ये दिसत होतीस, अशीही कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.