
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी केलीये. विशेष म्हणजे अजूनही पठाणचा जलवा बघायला मिळत आहे.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. बाॅलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधीलही सर्वात जास्त कमाई करणारा पठाणच ठरला आहे.

बाहुबलीचे रेकाॅर्ड तोडण्यासाठी पठाण हा चित्रपट फक्त एक पाऊस मागे आहे. बाहुबलीचे रेकाॅर्ड तोडण्यासाठी पठाणच्या निर्मात्यांनी खास प्लॅन तयार केला आहे. आता एका तिकिटावर दोनजण पठाण हा चित्रपट पाहू शकणार आहेत.

यशराज फिल्म्सने एक पोस्ट शेअर करत लिहिले की, 3 ते 5 मार्चपर्यंत एक तिकीट खरेदी करा आणि त्यासोबत एक तिकीट मोफत मिळवा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आहे. अटी आणि शर्ती लागू...अशाप्रकारची एक पोस्ट शेअर करण्यात आलीये.

पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत दीपिका पादुकोणही मुख्य भूमिकेत होती. बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.