
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ केवळ त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीबद्दलच नाही तर त्याच्या कथित अफेअरबद्दलही चर्चेत असतो. त्याची मैत्रीण प्राची सिंह देखील या तरुण क्रिकेटपटूवर प्रेमाचा वर्षाव करते. सोशल मीडियावर, दोघंही अनेक वेळा अशी चिन्हे देतात, जे दर्शवते की या दोघांमध्ये काही तरी आहे.

प्राची सिंग आणि पृथ्वी शॉ एकमेकांना डेट करत आहेत अशी सतत चर्चा आहे. जरी दोघांनी याबद्दल उघडपणे काहीही सांगितले नाही, तरी पृथ्वी आणि प्राचीच्या सोशल मीडियावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

प्राची सिंहचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबईत झाला. प्राची खूप सुंदर आहे आणि ती सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय आहे.

पृथ्वी शॉची मैत्रीण प्राची सिंगने मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे.

प्राची सिंहने 2019 मध्ये मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. कलर्स टीव्ही शो 'उडान' मध्ये प्राची सिंहने वंशिका शर्माची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. प्राची सिंह एक उत्तम अभिनेत्याबरोबरच एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. प्राची सिंह अनेकदा तिच्या नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते. जे चाहत्यांना खूप आवडतात.