प्राजक्ताने शाहरुख खानसोबत केलंय काम, त्या चित्रपटात एका सीनसाठी घेतले 17 टेक, आता फोटो होतोय Viral

प्राजक्ता माळीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत केलंय काम. फक्त एका सीनसाठी घेतलेले तब्बल 17 टेक. त्या सीनचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल.

| Updated on: Jul 24, 2026 | 3:57 PM
1 / 5
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आज अभिनय, सूत्रसंचालन आणि उद्योजकता या तिन्ही क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आणि कर्जतजवळ आलिशान फार्महाऊसही आहे.

2 / 5

मात्र, अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे प्राजक्ताच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2004 साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या गाजलेल्या 'स्वदेस' या हिंदी चित्रपटातून झाली होती. या चित्रपटात तिने अतिशय छोटी भूमिका साकारली होती.

3 / 5

एका सीनमध्ये शाहरुख खान गायत्री जोशीच्या मागे दुकानातून बाहेर येताना दोन मुलींना धडकतो आणि त्यापैकी एक मुलगी म्हणजे प्राजक्ता माळी होती. करिअरच्या सुरुवातीचा तो अनुभव असल्याने शाहरुख खानसोबत काम करताना ती प्रचंड दडपणाखाली होती.

4 / 5

त्यामुळे हा छोटासा सीन पूर्ण करण्यासाठी तिला अनेक टेक द्यावे लागल्याची माहिती समोर आली आहे.काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या चित्रपटातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्या आठवणींना उजाळा दिला.

5 / 5

'शाहरुखसोबतचा हा एक दुर्मिळ फोटो... होय, ती मीच आहे,' असे तिने पोस्टमध्ये नमूद केले होते. विशेष म्हणजे, प्राजक्ताप्रमाणेच अनेक मराठी अभिनेत्रींच्या अभिनय प्रवासाची सुरुवात हिंदी चित्रपटांतील छोट्या भूमिकांपासून झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us