
अभिनेत्री अमृता सुभाष हिने शुटिंग दरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. नुकताच झालेल्या एका मुलखातीत निर्माते अभिनेत्रींकडे विचित्र मागण्या करतात... असं अमृता म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमृता हिची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री म्हणाली, 'एकदा माझ्याकडून घरगुती हिंसाराचा सीन शूट करुन घेतला होता. जो मला बिलकूल करायचा नव्हता... असा कोणता सीन मला शूट करायचा आहे.. असं मला सांगण्यात देखील आलं नव्हतं...'

पुढे अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा ऑनस्क्रिन पती पत्नीला मरतो, तेव्हा टीआरपी वाढते... अलं निर्माता मला म्हणाला होता. हे ऐकून मला प्रचंड वाईट वाटलं... माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड वाईट होता...' असं देखील अमृता म्हणाली...

सांगायचं झालं तर, अमृता हिने 2004 मध्ये अभिनय क्षेत्रात पाय ठेवला. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अमृता हिने मराठी आणि बॉलिवूडमध्ये अनेक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

अमृता हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.