
अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) यांनी लग्नानंतर रिसेप्शनचं आयोजन केलं. या रिसेप्शनचे फोटो समोर आले आहेत. शिवानी-विराजसच्या रिसेप्शनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.

विराजस आणि शिवानीने 3 मे रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्या मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नानंतर काही दिवसांनी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं.

लग्नात या दोघांनी साऊथ स्टाइल पोशाख केला होता. सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा झाली होती. आता रिसेप्शनसाठी शिवानीने लेहंगा परिधान केला, तर विराजसने शेरवानीला पसंती दिली.

विराजसची 'माझा होशील ना' ही मालिका खूप गाजली होती. याच मालिकेवरून रिसेप्शनला ही खास रांगोळी काढण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच विराजस आणि शिवानीने सोशल मीडियावर रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती. मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील ही लोकप्रिय जोडी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नसोहळ्याला जेव्हा दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान करत हजेरी लावली, तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. या चर्चांवर तसं दोघांनी स्पष्टपणे होकार किंवा नकारही दिला नव्हता.

रिसेप्शनसाठी तयार होत असताना सासूबाईंसोबत टिपलेला शिवानीचा हा खास फोटो..

विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. तर शिवानीने ‘बन मस्का’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.