
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहते कायम रकुल प्रित सिंग हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण आता अभिनेत्री ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

रकुलने साडीमधली स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुललेलं दिसत आहे.

रकुल फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, ग्लॅमरस अदांमुळे देखील चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रकुल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.