
रकूल प्रित सिंग हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

आता रकूल प्रित सिंग तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रकूल प्रित सिंग हिच्या नव्या लूकची चर्चा आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

गुलाबी रंगाच्या पारंपरिक लेहेंग्यामध्ये रकूल प्रित सिंग प्रचंड सुंदर दिसत आहे. आता दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे तुम्ही रकूल प्रित सिंग हिचा पारंपरिक लूक फॉलो करु शकता.

रकूल प्रित सिंग कायम सोशल मीडियावर वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. रकूल प्रित सिंग फक्त वेस्टर्ल लूकमध्ये नाही तर, पारंपरिक लूकमध्ये देखील फोटो पोस्ट करत असते.

रकूल प्रित सिंग हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.