
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत अत्यंत बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले.

विशेष म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे नेहमीच सोबत स्पाॅट देखील होतात. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशनवर नुकताच रणबीर कपूर याने मोठे भाष्य केले आहे. रणबीर कपूर म्हणाला की, आदित्य रॉय कपूर हा एका मुलीवर खूप जास्त प्रेम करतो.

तो त्या मुलीच्या मागे पुढे फिरत असतो, विशेष म्हणजे त्या मुलीचे नाव हे A ने सुरू होते. रणबीर कपूर याचे हे बोलणे ऐकून चाहत्यांना देखील मोठा आनंद झाला आहे.

रणबीर कपूर याने इशाऱ्या इशाऱ्यामध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा चित्रपट रिलीज झाला.